‘या’ पाणीपुरीवाल्याला सॅल्युट; ९९ हजारांत जन्मभर अनलिमिडेट पाणीपुरी मिळणार
नागपूरमधील विजय मेवालाल गुप्ता यांनी पाणीपुरीसाठी अनोख्या ऑफर्स दिल्या आहेत. ९९ हजार रुपयांत आजन्म अनलिमिटेड पाणीपुरीची ऑफर आहे. १५१ पाणीपुरी खाणाऱ्याला २१ हजारांचं बक्षीस मिळेल. महाकुंभ ऑफरमध्ये ४० पाणीपुरी फक्त १ रुपयात, तर लाडकी बहीण योजनेत महिलांना ६० रुपयांत अनलिमिटेड पाणीपुरी मिळेल. आठवड्याची आणि मासिक ऑफरही उपलब्ध आहेत.