नागपुरात संचारबंदी लागू, पोलिसांना प्रभावित रस्ते बंद करण्याचे आदेश; अधिसूचना जारी!
नागपुरात कबर हटवण्याच्या मागणीवरून दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीनंतर तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे नागपूर शहरातील अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रविंदर कुमार सिंगल यांनी रहिवाशांना आश्वासन दिले की परिस्थिती नियंत्रणात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. नागपूरची शांतता राखण्यासाठी सर्वांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.