rss chief mohan bhagwat on ott platform
1 / 30

OTT वर मोहन भागवतांचा तीव्र आक्षेप; म्हणाले, “जे सांगणंही अभद्र ठरेल इतकं बीभत्स…”

OTT प्लॅटफॉर्म्स आजच्या काळात मनोरंजनाचा महत्त्वाचा स्रोत बनले आहेत. विविध भाषांमधील वेबसीरिज, चित्रपट, डॉक्युमेंटरी इत्यादी मजकूर प्रदर्शित केला जातो. सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमीच्या भाषणात OTT प्लॅटफॉर्म्सवरील मजकुरावर आक्षेप घेतला. त्यांनी कुटुंबातील संस्कार, शिक्षण आणि समाजातील आदर्श व्यक्तींच्या वर्तनावर भाष्य केले. माध्यमांनी जबाबदारीने वागावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Swipe up for next shorts
rss chief mohan bhagwat speech nagpur (1)
2 / 30

“धर्म अनेक आहेत, पण त्या सगळ्यांच्या वरचा धर्म भारताचा प्राण आहे”, मोहन भागवतांचं भाष्य!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमीच्या निमित्ताने नागपूरमध्ये भाषण केले. संघाच्या १०० व्या वर्षात पदार्पणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भागवत यांनी हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानावर भाष्य केले आणि तो मानवधर्म व विश्वधर्म असल्याचे सांगितले. त्यांनी स्वदेशी वस्तूंच्या वापराचे महत्त्वही अधोरेखित केले आणि OTT प्लॅटफॉर्म्सवरील अश्लीलतेवर तीव्र आक्षेप नोंदवला.

Swipe up for next shorts
Aishwarya Rai Bachchan Post for Amitabh Bachchan
3 / 30

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या रायने सासरे अमिताभ बच्चन यांच्यासाठी केली ‘ती’ पोस्ट

बच्चन कुटुंबात मतभेद असल्याच्या चर्चांदरम्यान, ऐश्वर्या राय बच्चनने सासरे अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली. ११ ऑक्टोबरला बिग बी ८२ वर्षांचे झाले. ऐश्वर्याने आराध्याबरोबरचा फोटो शेअर करत 'हॅप्पी बर्थडे पा-दादाजी' असे कॅप्शन दिले. तिच्या पोस्टला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत.

Swipe up for next shorts
Jigra vs Vicky Vidya Ka Woh Wala Video collectionJigra vs Vicky Vidya Ka Woh Wala Video collection
4 / 30

Jigra vs Vicky Vidya Ka Woh Wala Video: कमाईत कोणता सिनेमा वरचढ? जाणून घ्या

११ ऑक्टोबरला दोन मोठे बॉलीवूड चित्रपट प्रदर्शित झाले: 'जिगरा' आणि 'विकी और विद्या का वो वाला व्हिडीओ'. राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांच्या 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ'ने पहिल्या दिवशी ५ कोटी रुपयांची कमाई केली, तर आलिया भट्टच्या 'जिगरा'ने ४.५५ कोटी रुपये कमावले. 'जिगरा'ला बॉक्स ऑफिसवर तगडी टक्कर मिळाल्याने त्याची कमाई कमी झाली. वीकेंडला चित्रपटांचा व्यवसाय कसा होतो ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

who is kunal bhagat Ankita Prabhu Walawalkar fiance
5 / 30

काय करतो अंकिता वालावलकरचा होणारा पती? जाणून घ्या

कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर लवकरच संगीत दिग्दर्शक कुणाल भगतसोबत लग्न करणार आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात चौथी रनर अप राहिलेल्या अंकिताने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून कुणालचे नाव जाहीर केले. दोघांनी 'आनंदवारी' गाण्यात एकत्र काम केले आहे. अंकिता आणि कुणाल फेब्रुवारी महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात लग्न करणार आहेत.

Ankita Prabhu Walawalkar fiance kunal bhagat
6 / 30

‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? अखेर अंकिता वालावलकरने केला खुलासा

बिग बॉस मराठी ५ फेम कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर लवकरच लग्न करणार आहे. बिग बॉसमधून बाहेर आल्यावर तिने तिच्या लग्नाचे प्लॅन्स सांगितले होते. अखेर १२ ऑक्टोबर रोजी तिने तिच्या होणाऱ्या पतीचं नाव जाहीर केलं आहे. अंकिताने सुंदर फोटो शेअर करत 'सूर जुळले' असं म्हटलं आहे. तिच्या होणाऱ्या पतीचे नाव कुणाल भगत आहे.

rss chief mohan bhagwat speech nagpur
7 / 30

Video: सरसंघचालक मोहन भागवतांचं हिंदूंना आवाहन; म्हणाले, “तुमच्या लक्षात यायला हवं की…”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभराव्या वर्धापन दिनानिमित्त नागपूरमध्ये आयोजित दसरा मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषण केले. त्यांनी भारताच्या जागतिक आव्हानांवर भाष्य करत हिंदू समाजाला संघटित राहण्याचे आवाहन केले. बांगलादेशमधील हिंदूंच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत, त्यांनी भारताविरुद्ध बांगलादेश-पाकिस्तान हातमिळवणीची शक्यता मांडली. भारताच्या प्रगतीला विरोध करणाऱ्या देशांवरही त्यांनी भाष्य केले.

gautami patil took blessings of arun kadam
8 / 30

Video: गौतमी पाटीलने अभिनेते अरुण कदम यांचे घेतले आशीर्वाद, नेटकऱ्यांनी केलं कौतुक

गौतमी पाटील आणि अरुण कदम यांची नुकतीच एका कार्यक्रमात भेट झाली. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातील अरुण कदम यांना भेटून गौतमीने त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. या भेटीचा व्हिडीओ गौतमीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. चाहत्यांनी या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी गौतमीच्या संस्कारांचे कौतुक केले आहे.

ramraje naik nimbalkar ajit pawar (1)
9 / 30

अजित पवारांना मोठा धक्का, रामराजे नाईक निंबाळकरांनी मार्ग बदलला; म्हणाले, “इथून पुढे मी…”

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शरद पवार गटात जाण्याच्या चर्चांना उधाण आले होते. शरद पवारांच्या सूचक विधानांमुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले. रामराजे नाईक निंबाळकर यांनी महायुतीबरोबर काम करण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत चर्चा सुरू झाली आहे.

Daily Horoscope 12th October 2024 Rashibhavishya in Marathi | dasara 2024
10 / 30

दसऱ्याला ‘या’ राशींवर धन-सुखाची बरसात; प्रेमात यश तर नोकरी, व्यवसायातून मिळेल बक्कळ पैसा;

१२ ऑक्टोबरला अश्विन शुक्ल पक्षातील उदया तिथी नवमी आणि शनिवार आहे.नवमी तिथी आज सकाळी १०.५९ पर्यंत असेल. त्यानंतर दशमी तिथी सुरू होईल. आज नवमी तिथीला विजयाचे प्रतीक असलेला 'दसरा आणि विजयादशमी' हा सणही साजरा केला जाईल. दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व आहे. आज दसऱ्याच्या दिवशी रात्री १२.२२ पर्यंत धृति योग राहील. तर पहाटे ४.२८ दिवसभर श्रावण नक्षत्र जागृत असेल. आज दसऱ्या शुभदिनी कोणात्या राशींवर होईल सुखाची बरसात आणि कोणाच्या पदरात पडणार निराशा जाणून घेऊ या…

Bigg Boss 18 Gunaratna Sadavarte dance in a diamond suit worth one and a half lakhs video viral
11 / 30

दीड लाखांचा हिरेजडीत सूट घालून गुणरत्न सदावर्तेंचा भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा सध्या पहिल्याच आठवडा सुरू आहे. हे पर्व सुरू होऊन चार दिवस उलटले आहेत. पण घरातील १८ सदस्यांनी पहिल्या दिवसापासून चांगलंच गाजवलं आहे. या १८ सदस्यांमधून सगळ्यात चर्चेत असलेले सदस्य म्हणजे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते. . चौथ्या दिवशी गुणरत्न सदावर्तेंचा हटके अंदाज पाहायला मिळाला.

Kajol got angry at Durga Puja Pandal
12 / 30

Video: दुर्गा पूजेदरम्यान भडकली काजोल, हातात माईक घेतला अन् रागात…

मुंबईत दुर्गापूजा साजरी करताना अभिनेत्री काजोलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पंडालमध्ये काही लोक देवीच्या मूर्तीच्या बाजूला शूज घालून उभे होते, हे पाहून काजोलने त्यांना शूज काढण्यास सांगितले. तिने माईकवरूनही सूचना दिल्या. या कृतीचे अनेकांनी समर्थन केले, तर काहींनी तिला शांतपणे सांगायला हवे होते असे म्हटले. आलिया भट्टही पूजेत सहभागी झाली होती.

dussehra 2024 shani mangal gochar 2024 saturn and mars make shadashtak yog
13 / 30

शनीची मंगळावर वक्रदृष्टी; ‘या’ राशींचा सुरू होणार वाईट काळ

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा सेनापती मंगळ एका ठराविक काळानंतर राशिबदल करतो. मंगळाच्या राशिबदलामुळे १२ राशींच्या लोकांच्या आयुष्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रभाव पडत असतो. नऊ ग्रहांमध्ये मंगळ हा खूप खास ग्रह मानला जातो. दसऱ्यानंतर मंगळ ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे आणि कर्क राशीत येताच मंगळावर शनीची वक्रदृष्टी पडणार आहे. अशा स्थितीत षडाष्टक नावाचा योग तयार होईल. या योगाच्या निर्मितीमुळे काही राशींना फायदा; तर काहींना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

Actor Arjun Mathur married to Tiya Tejpal
14 / 30

४२ वर्षीय बॉलीवूड अभिनेत्याने गुपचूप उरकलं दुसरं लग्न, फोटो आले समोर

'मेड इन हेवन' फेम अभिनेता अर्जुन माथूरने त्याची गर्लफ्रेंड टिया तेजपालशी साधेपणाने लग्न केलं. टिया तेजपालचा भाऊ करण तेजपालने इन्स्टाग्रामवर या दोघांच्या लग्नाचा फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी दिली. अर्जुन माथूरने अनेक वेब सीरिज व चित्रपटांमध्ये काम केलं आहे, तर टिया तेजपाल प्रॉडक्शन डिझायनर आहे. दोघेही बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते.

nobel peace prize
15 / 30

मोठी बातमी! निहॉन हिदानक्यो या जपानी संस्थेला शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर

यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. निहॉन हिदानक्यो या जपानी संस्थेला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या संस्थेनं हिरोशिमा आणि नागासाकीतील अणूबॉम्ब पीडितांसाठी मोठं काम केलं आहे. जग हे अण्वस्त्र मुक्त व्हावं, यासाठी ही संस्था काम करते. या कामाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

Kedar shinde on aarya jadhao nikki tamboli fight
16 / 30

निक्कीला मारणाऱ्या आर्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय योग्य होता का? केदार शिंदे म्हणाले…

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाने टीआरपीचे रेकॉर्ड मोडले, परंतु १०० दिवसांऐवजी ७० दिवसांत शो संपवण्याचा निर्णय घेण्यात आला. कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांनी सांगितले की, मॅनेजमेंटच्या निर्णयामुळे हा शो ७० दिवसांचा करण्यात आला. आर्या जाधवला निक्कीला मारल्यामुळे निष्कासित करण्यात आले. शिंदे म्हणाले की, बिग बॉसच्या नियमांनुसार शारीरिक हिंसा मान्य नाही, त्यामुळे हा निर्णय योग्य होता.

Marathi actor Santosh Juvekar first look out of raanti movie
17 / 30

‘रानटी’ चित्रपटातील संतोष जुवेकरचा खतरनाक लूक आला समोर, चाहते म्हणाले, “भाऊ काय ऐकत नाय…”

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारा संतोष जुवेकर लवकरच नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'रानटी' असं त्याच्या नव्या चित्रपटाचं नाव असून या चित्रपटात शरद केळकरच्या बालपणीच्या जिगरी मित्राची म्हणजे ‘बाळा’च्या भूमिकेत संतोष पाहायला मिळणार आहे. या भूमिकेसाठी चक्क संतोषने टक्कल करून घेतलं आहे. एवढंच नव्हे तर त्याने पायाने अपंग व्यक्तिरेखा साकारण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. नुकताच 'रानटी' चित्रपटातील संतोषचा पहिला लूक समोर आला आहे.

Bigg Boss 18 Advocate Gunratan Sadavarte told his love story
18 / 30

गुणरत्न सदावर्तेंनी सांगितली त्यांच्या ‘प्रेमाची गोष्ट’, जोरजोरात ओरडत म्हणाले…

Bigg Boss 18 : ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वामुळे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते खूप चर्चेत आहेत. चार दिवसांमध्ये गुणरत्न सदावर्तेंनी आपल्या अनोख्या अंदाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. १० ऑक्टोबरच्या भागात त्यांनी पत्नी जयश्री यांची आठवण येत असल्याचं जाहीर केलं. एवढंच नव्हे तर काही सदस्यांबरोबर त्यांच्या प्रेमाच्या आठवणी सांगितल्या.

Abhishek Karangutkar post for suraj chavan
19 / 30

“आपला जन्म कसा, कुठे, केव्हा…”, सूरज चव्हाणला बिग बॉसमध्ये संधी देणाऱ्या अभिषेकची पोस्ट

बारामतीजवळच्या मोढवे गावात गरीब कुटुंबात जन्मलेला सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला. कास्टिंग डायरेक्टर अभिषेक करंगुटकरने सूरजच्या संघर्षमय जीवनाबद्दल पोस्ट केली आहे. सूरजने मजुरीपासून बिग बॉसपर्यंतचा प्रवास केला. अभिषेकने सूरजच्या प्रवासातील फोटो आणि अनुभव शेअर केले आहेत. नेटकऱ्यांनी अभिषेकचे सूरजला संधी दिल्याबद्दल कौतुक केले आहे.

Bigg Boss 18 What did Gunaratna Sadavarte do not to go to the jail
20 / 30

गुणरत्न सदावर्ते ‘बिग बॉस’मधील १७ सदस्यांवर पडले भारी, जेलमध्ये न जाण्यासाठी काय-काय केलं?

मनोरंजन October 11, 2024

‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात पहिल्या दिवसापासून फुल्ल ड्रामा पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे चार दिवसांत अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अवघ्या चार दिवसांत त्यांनी आपल्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. १० ऑक्टोबरच्या संपूर्ण भागात गुणरत्न सदावर्ते यांनी मनोरंजन केल्याचं म्हटलं जात आहे. या भागात सदावर्तेंना जेलमध्ये टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता? पण नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या…

Kedar Shinde reacts in Sympathy allegation about suraj chavan
21 / 30

सूरज चव्हाणला जिंकवणं हा सहानुभूतीचा खेळ? अभिजीतचं नाव घेत केदार शिंदे म्हणाले…

रील स्टार सूरज चव्हाण बिग बॉस मराठी ५ चा विजेता ठरला. त्याच्या विजयावर काहींनी जल्लोष केला, तर काहींनी टीका केली. अभिजीत सावंत विजेता व्हावा असं अनेकांना वाटत होतं. कलर्स मराठीचे केदार शिंदे यांनी टीकेवर प्रतिक्रिया देत, प्रेक्षकांच्या मतांचा आदर केला असल्याचं सांगितलं. सूरज जिंकल्यावर मनोरंजनसृष्टीतून 'सिंपथी गेम' असल्याचं मत व्यक्त केलं गेलं.

Suraj chavan met kajal Shinde
22 / 30

Video: भेटायला आलेल्या तिला सूरच चव्हाण म्हणाला, “तू माझी हिरोईन आहेस”

बारामतीजवळच्या मोढवे गावातील सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत संघर्ष करून विजेतेपद मिळवणारा सूरज गावी पोहोचल्यावर त्याची मैत्रीण काजल शिंदेशी भेट झाली. नेटकरी त्यांना लग्नाचा सल्ला देत आहेत. सूरज लवकरच 'राजाराणी' चित्रपटात दिसणार आहे. त्याला १४.६ लाख रुपये आणि इतर भेटवस्तू मिळाल्या आहेत.

when pet dog goa saw ratan tata for the last time video
23 / 30

जेव्हा पाळीव श्वानाने रतन टाटा यांना शेवटचं पाहिलं, व्हिडीओ व्हायरल

मुंबई October 11, 2024

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण देश हळहळला आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी जमली होती. त्यांच्या लाडक्या पाळीव श्वान 'गोवा'चा व्हिडीओ पाहून लोक भावुक झाले आहेत. रतन टाटा यांना प्राण्यांची विशेषतः श्वानांची खूप आवड होती. 'गोवा' हा श्वान ११ वर्षांपूर्वी रस्त्यावर सापडला होता आणि टाटांनी त्याचे नाव 'गोवा' ठेवले होते.

state government spend 24 crore rupees to communicate decisions via SMS to citizens
24 / 30

नॉन क्रिमिलेअरची उत्पन्न मर्यादा वाढवण्यासाठी राज्याची केंद्राकडे विनंती

ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राबाबत राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नॉन क्रिमिलेअरची उत्पन्न मर्यादा वाढवण्याची विनंती केंद्र शासनाला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सधन गटातील ओबीसींना 'क्रिमिलेअर' आणि गरीब घटकाला 'नॉन-क्रिमिलेअर' म्हणून वर्गीकृत केले आहे. उत्पन्न मर्यादा आठ लाखांवरून पंधरा लाख रुपये करण्याची शिफारस केली जाणार आहे. हरियाणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो.

Durga Puja 2024 Jaya Bachchan Kiss to kajol video gone viral
25 / 30

जया बच्चन यांनी काजोलला घट्ट मिठी मारून केलं गालावर किस, नेटकरी म्हणाले, “दोघी सारख्या…”

मनोरंजन October 11, 2024

बॉलीवूडच्या अनेक कलाकारांकडे सध्या दुर्गा पूजाची धामधूम सुरू आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही बॉलीवूड कलाकार मनोभावे दुर्गा पूजा करताना दिसत आहेत. अभिनेत्री काजोलने नवरात्री उत्सवानिमित्ताने दुर्गा पंडालचं आयोजन केलं आहे. काजोल आपल्या कुटुंब आणि मित्र परिवारासह दुर्गा पूजेच्या उत्साहात करताना दिसत आहे. अभिनेत्री राणी मुखर्जी, अयान मुखर्जी आणि रणबीर कपूरसह अनेक बॉलीवूड कलाकारांनी देवीचं दर्शन घेतलं आहे. दुर्गा पंडालमधील काजोल आणि जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.

Narayan Murthy and Narendra modi
26 / 30

“…अन् मी रतन टाटांकडून नम्रतेचा धडा घेतला”, नारायण मूर्तींनी सांगितली जुनी आठवण!

टाटा उद्योगसमूहाचे माजी अध्यक्ष रतन नवल टाटा यांचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. इन्फोसिसचे अध्यक्ष नारायण मूर्ती यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. मूर्ती यांनी सांगितले की, रतन टाटा हुबळीतील अक्षय पत्र किचनच्या उद्घाटनासाठी आले होते आणि त्यांनी सर्व कार्यक्रमात सहभाग घेतला होता. दिल्लीत आयोजित डिनर कार्यक्रमातही टाटा यांनी विनम्रतेने सहभाग घेतला होता.

Girl cried at ratan tata funeral
27 / 30

Video: रतन टाटा यांचे अंत्यदर्शन घेतल्यावर तरुणी हमसून हमसून रडली, पाहा भावुक व्हिडीओ

दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर मुंबईत त्यांच्या अंत्यसंस्काराला मोठी गर्दी झाली होती. यावेळी एक तरुणी हमसून रडताना दिसली, तिचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रतन टाटा यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे बुधवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराला केंद्रीय मंत्री अमित शाह, पियुष गोयल, मुकेश अंबानी, आमिर खान यांसारख्या अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.

Ratan Tata Last rites
28 / 30

रतन टाटांना अखेरचा सलाम! दयाळू व्यावसायिकाला निरोप देताना महाराष्ट्रासह देश हळहळला

मुंबई October 11, 2024

यशस्वी उद्योजक, परोपकारी आणि प्राणीप्रेमी रतन टाटा अनंतात विलीन झाले. वरळीतील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. देशभरातील असंख्य लोकांनी मुंबईत येऊन त्यांना अखेरचा निरोप दिला.

Maruti Suzuki Grand Vitara Dominion Edition on Alpha, Zeta and Delta variants know its features and price
29 / 30

मारुतीसमोर क्रेटा फेल, ‘या’ एसयूव्हीचं लिमिटेड एडिशन झालं लॉंच, दिवाळीत करणार मार्केट जाम

ऑटो October 11, 2024

भारतीय बाजारपेठेतील मिडसाईज एसयूव्ही सेगमेंटमध्ये आपले वर्चस्व वाढवण्यासाठी आणि सणादरम्यान ग्राहकांना चांगले प्रोडक्ट्स देण्यासाठी, मारुती सुझुकीने आपल्या लोकप्रिय एसयूव्ही ग्रँड विटाराची नवीन डोमिनियन एडिशन लॉन्च केली आहे. ग्रँड विटाराच्या या लिमिटेड एडिशनच्या मॉडेलमध्ये, एक्स्टिरियर आणि इंटेरियरला अधिक चांगले आणि कंफरटेबल बनवले गेले आहे. डोमिनियन एडिशन ग्रँड विटारा फक्त डेल्टा, झेटा आणि अल्फा व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. व्हेरिएंटवर अवलंबून, प्रत्येकाला वेगवेगळ्या किंमतीचे ऍक्सेसरी पॅकेज मिळते.

Bollywood alia Bhatta sing oo antava song for Samantha Ruth Prabhu
30 / 30

Video: आलिया भट्टने समांथा प्रभू समोर गायलं ‘ऊ अंटावा’ गाणं, व्हिडीओ होतोय व्हायरलं

मनोरंजन October 10, 2024

नुकताच हैदराबादमध्ये ‘जिगरा’ चित्रपटाचा प्री-रिलीज इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. या इव्हेंटला आलिया, वेदांगसह अभिनेत्री समांथा रुथ प्रभु, राणा दग्गुबाती आणि प्रसिद्ध दिग्दर्शक त्रिविक्रिम श्रीनिवास यांनी उपस्थिती लावली होती. या इव्हेंटमधील आलियाचे ( Alia Bhatt ) अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यापैकी आलियाच्या एका व्हिडीओने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ज्यामध्ये अभिनेत्री ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटातील ‘ऊ अंटावा’ गाणं गाताना दिसत आहे.