नागपूर दंगलीप्रकरणी देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, हल्लेखोरांकडूनच वसूल करणार नुकसानभरपाई
सोमवारी नागपुरात दोन गटांत झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तांबरोबर बैठक घेऊन 92 लोकांना अटक केली. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे. दंगेखोरांची प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाई वसूल केली जाईल. दंगा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.