विमानतळ नवी मुंबईत, फायदा पुणेकरांचा! लोहगावपेक्षा या विमानतळाला प्राधान्य का?
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येत्या १७ एप्रिलपासून प्रवाशांसाठी खुलं होणार आहे. पुणेकरांसाठी हे विमानतळ महत्त्वाचं ठरणार आहे कारण मुंबई विमानतळापेक्षा नवी मुंबई विमानतळाचं अंतर कमी आहे. लोहगाव विमानतळाच्या मर्यादांमुळे पुणेकरांना आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी नवी मुंबई विमानतळ अधिक सोयीचं ठरेल. उद्योग-व्यावसायिकांसाठीही हे विमानतळ फायदेशीर ठरेल. विमान कंपन्याही लवकरच इथून सेवा सुरू करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.