एकतर्फी नाही, लव्ह ट्रँगलमधून यशश्री शिंदेची हत्या? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती!
उरण येथील २२ वर्षीय यशश्री शिंदेची २५ जुलै रोजी एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आली होती. आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातील शाहपूर टेकडी परिसरातून अटक करण्यात आली. यशश्रीच्या पालकांनी त्याच्याविरोधात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी सांगितले की, हत्येमागे लव्ह ट्रँगल असून लव्ह 'जिहाद' नसल्याचं स्पष्ट केलं. आरोपीला नवी मुंबईत आणून चौकशी सुरू होईल.