दीड वर्षापासून भात, पोळी, साखर काहीच खाल्लं नाही; बॉलीवूड अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला…
टीव्ही मालिकांमधून करिअरची सुरुवात करणाऱ्या गुरमीत चौधरीने 'रामायण'मधून लोकप्रियता मिळवली आणि 'खामोशियां' सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. सध्या त्याची वेब सीरिज ‘ये काली काली आंखें 2’ चर्चेत आहे. या भूमिकेसाठी गुरमीतने दीड वर्ष साखर, पोळी, भात किंवा ब्रेड न खाता कठोर आहार पाळला. त्याने भारती सिंग व हर्ष लिंबाचियाच्या पॉडकास्टमध्ये ही माहिती दिली.