जगभर गाजलेला All We Imagine As Light ओटीटीवर ‘या’ तारखेला रिलीज होणार
'ऑल वी इमॅजिन ॲज लाइट' हा २०२४ मध्ये चर्चेत राहिलेला भारतीय चित्रपट जानेवारी महिन्यात डिस्ने+ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. मुंबईतील दोन मल्याळी परिचारिकांच्या आयुष्याची कथा सांगणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन पायल कपाडियाने केले आहे. कान २०२४ चित्रपट सोहळ्यात 'ग्रां पी' पुरस्कार मिळवणारा हा चित्रपट गोल्डन ग्लोबसाठीही नामांकित झाला आहे. कनी कुसरुती, दिव्या प्रभा, छाया कदम, हृधू हारून आणि अजीस नेदुमनगड हे कलाकार आहेत.