वर्णद्वेषी विनोद करणाऱ्या कपिल शर्माला ॲटली कुमारचं स्पष्ट उत्तर; म्हणाला, “मी कसा दिसतो…”
कॉमेडियन कपिल शर्मा 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये केलेल्या विनोदांमुळे पुन्हा एकदा टीकेचा धनी ठरला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक ॲटली कुमार शोमध्ये हजेरी लावली असता, कपिलने ॲटलीच्या दिसण्यावर विनोद केला. ॲटलीने कपिलला सडेतोड उत्तर देत, दिसण्यावरून मतं तयार करू नयेत असं सांगितलं. या एपिसोडमधील क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून कपिलला ट्रोल केलं जात आहे.