ऑफिसमधील कोणी केला खून? ‘हा’ सिनेमा पाहून डोकं चक्रावेल; प्राइम व्हिडीओवर आहे उपलब्ध
जर तुम्हाला सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट आवडत असतील तर मल्याळम चित्रपट 'गोलम' नक्की पहा. ७ जून २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने थिएटरमध्ये आणि ओटीटीवर चांगली कामगिरी केली आहे. 'गोलम'मध्ये ऑफिसच्या एमडीच्या खुनाची रहस्यमय कथा आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. समजाद दिग्दर्शित आणि प्रवीण विश्वनाथ लिखित या चित्रपटात रंजीत सजीव, शीतल जोसेफ यांचा दमदार अभिनय आहे.