‘बिग बॉस ओटीटी २’ फेम बिहारच्या मनीषा रानीचं स्वप्न पूर्ण; मुंबईत घेतलं हक्काचं घर
‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वातून घराघरात पोहोचलेल्या मनीषा रानीने आपल्या अनोख्या अंदाजाने हिंदी इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘बिग बॉस ओटीटी’नंतर मनीषा ‘झलक दिखला जा’च्या ११ व्या पर्वात पाहायला मिळाली. तिनं आपल्या जबरदस्त डान्सनं ‘झलक दिखला जा’चं ११ वं पर्व जिकलं. या दोन लोकप्रिय रिअॅलिटी शोनंतर ती ‘हिप हॉप इंडिया’च्या दुसऱ्या पर्वात दिसत आहे. अशा लोकप्रिय बिहारच्या मनीषा रानीचं एक स्वप्न पूर्ण झालं आहे. मुंबईत तिनं स्वतःचं हक्काचं आलिशान घर खरेदी केलं आहे.