ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ‘हे’ चित्रपट OTT होत आहेत प्रदर्शित, वाचा यादी
सप्टेंबर महिन्यात अनेक सुपरहिट चित्रपट ओटीटीवर रिलीज झाले. आता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात 'द ट्राइब', 'गोट', 'सीटीआरएल', 'अमर प्रेम की प्रेम कहानी' आणि 'द सिग्नेचर' हे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. 'गोट' ३ ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर, 'सीटीआरएल' आणि 'अमर प्रेम की प्रेम कहानी' ४ ऑक्टोबरला अनुक्रमे नेटफ्लिक्स आणि जिओ सिनेमावर, 'द ट्राइब' प्राइम व्हिडीओवर, आणि 'द सिग्नेचर' झी 5 वर रिलीज होणार आहेत.