हेमंत ढोमेचा ‘फसक्लास दाभाडे’ OTT वर प्रदर्शित, पण….; कुठे पाहता येणार सिनेमा? वाचा
हेमंत ढोमे दिग्दर्शित 'फसक्लास दाभाडे' हा चित्रपट जानेवारीत प्रदर्शित झाला होता आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. दाभाडे कुटुंबाची मजेदार गोष्ट आणि त्यांच्या आंबट-गोड नातेसंबंधांनी प्रेक्षकांना भुरळ घातली. आता हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ यांसारख्या कलाकारांनी यात भूमिका साकारल्या आहेत.