भारतातील सर्वाधिक पाहिला गेलेला फ्लॉप चित्रपट! मिळाले १०० कोटी व्ह्यूज; तुम्ही पाहिलात का?
'शोले' हा भारतातील सर्वात मोठा हिट चित्रपट मानला जातो, परंतु सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट नाही. टीव्ही व ओटीटीमुळे हे समीकरण बदलले. TRPS, स्ट्रीमिंग मिनिटं व युट्यूब व्ह्यूजनुसार अमिताभ बच्चन यांचा 'सूर्यवंशम' हा सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट आहे. १९९९ साली फ्लॉप झालेला हा चित्रपट सोनी मॅक्सवर शेकडो वेळा दाखवला गेला आहे. याला युट्यूबवर ७० कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. सर्व प्लॅटफॉर्मवर मिळून १०० कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.