या वीकेंडला ओटीटीवर काय पाहायचं? वाचा सिनेमा व वेब सीरिजची यादी
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ओटीटीवर अनेक चित्रपट आणि मालिका प्रदर्शित होणार आहेत. सैफ अली खानचा 'ज्वेल थीफ' २५ एप्रिलला नेटफ्लिक्सवर, सोहम शाहचा 'क्रेझी' २१ एप्रिलला प्राइम व्हिडिओवर, पृथ्वीराजचा 'एल२: एम्पुरान' जिओ हॉटस्टारवर, 'अय्याना माने' २५ एप्रिलला Zee5 वर, आणि बाबिल खानचा 'लॉगआउट' १८ एप्रिलला Zee5 वर प्रदर्शित झाला आहे.