जिओ सिनेमा व डिस्ने+हॉटस्टार झाले विलीन, JioHotstar वर पाहता येणार दोन्ही अॅपचा कंटेंट
जिओस्टार: वायकॉम 18 व स्टार इंडियाच्या करारानंतर जिओ सिनेमा व डिस्ने+हॉटस्टार हे अॅप्स विलीन झाले आहेत. आता जिओहॉटस्टार अॅपवर सर्व कंटेंट पाहता येईल. १४ फेब्रुवारीपासून हे अॅप मर्ज झाले असून, डिस्ने+हॉटस्टारचा लोगो व नाव बदलले आहे. जिओहॉटस्टारवर ३ हजार तासांचा कंटेंट, स्पोर्ट्स लाइव्ह स्ट्रीमिंग व ५० कोटींहून जास्त युजर्ससाठी विविध मेंबरशीप प्लॅन्स उपलब्ध आहेत.