करीना कपूरच्या चुलत भावाला ‘ब्लॅक वॉरंट’साठी मिळाला ‘हा’ पुरस्कार
नेटफ्लिक्सवरील 'ब्लॅक वॉरंट' या वेब सीरिजला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. यात जहान कपूर मुख्य भूमिकेत असून त्याला IMDbचा 'ब्रेकआउट स्टार' स्टारमीटर पुरस्कार मिळाला आहे. जहानने तिहार जेलमधील अधिकारी सुनील कुमार गुप्ता ही भूमिका साकारली आहे. या सीरिजला IMDb वर १० पैकी ८ रेटिंग मिळाले आहे. जहान कपूर शशी कपूर यांचा नातू असून त्याने २०२२ मध्ये अभिनयक्षेत्रात पदार्पण केले.