महाराष्ट्राची लेक झाली नेपाळची सून! प्राजक्ता कोळीने कर्जतमध्ये बॉयफ्रेंडशी केलं लग्न
'मिस्डमॅच' फेम मराठमोळी प्राजक्ता कोळीने तिचा बॉयफ्रेंड वृषांक खनाल याच्याशी कर्जतमध्ये २५ फेब्रुवारीला लग्न केले. मेहंदी, हळदी समारंभ, संगीत नाईटनंतर विवाह सोहळा पार पडला. प्राजक्ताने आयव्हरी रंगाचा पेस्टल वर्क असलेला लेहेंगा आणि वृषांकने पांढरी शेरवानी परिधान केली होती. प्राजक्ताने लग्नाचे फोटो शेअर करत तारीख २५.२.२०२५ कॅप्शनमध्ये लिहिली आहे.