नाना पाटेकरांचा ‘वनवास’ घरबसल्या पाहता येणार; कधी, कुठे पाहता येणार हा सिनेमा? वाचा…
दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेला 'वनवास' चित्रपट आता Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर १४ मार्च २०२५ पासून पाहता येईल. थिएटरमध्ये फ्लॉप ठरलेल्या या चित्रपटात नाना पाटेकर वृद्ध विधुर प्रताप सिंघानियाच्या भूमिकेत आहेत. उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'वनवास'ची तुलना 'बागबान'शी झाली होती आणि त्याच्या भावनिक कथेचे खूप कौतुक झाले होते.