OTT Release This Week: डिसेंबरच्या पहिल्या वीकेंडला ओटीटीवर काय पाहायचं? वाचा
डिसेंबर महिन्यात अनेक चित्रपट आणि सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. साई पल्लवी व शिवकार्तिकेयन यांचा 'अमरन' ५ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर, वरुण तेजचा 'मटका' ५ डिसेंबरला प्राइम व्हिडीओवर, प्रतीक गांधीचा 'अग्नी' ६ डिसेंबरला प्राइम व्हिडीओवर, आलिया भट्टचा 'जिगरा' ६ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर, तन्वी मुंडलेची 'मायरी' ६ डिसेंबरला झी5 वर आणि 'तनाव सीजन 2' ६ डिसेंबरला सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे.