बोल्ड कंटेंटमुळे थिएटरमध्ये प्रदर्शित न होऊ शकलेले ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध
करोना काळात थिएटर्स बंद झाल्याने चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित होऊ लागले. यापूर्वी बोल्ड कंटेंटमुळे सेन्सॉर बोर्डाने बंदी घातलेले अनेक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ शकले नाहीत. 'अँग्री इंडियन गॉडेस', 'ब्लॅक फ्रायडे', 'अनफ्रीडम', 'गार्बेज', 'फायर', आणि 'लोएव' हे चित्रपट बोल्ड कंटेंटमुळे थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ शकले नाहीत, पण आता हे सर्व चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहेत.