‘वक्फ’साठी १४ तास अन् मणिूपरसाठी फक्त ४१ मिनिटे; रात्री २ वाजता नेमकी चर्चा काय?
लोकसभेत वक्फ विधेयक मंजूर झाल्यानंतर मध्यरात्री २ वाजता मणिपूर प्रकरणावर चर्चा झाली. मात्र, ही चर्चा फक्त ४१ मिनिटेच चालली आणि गृहमंत्री अमित शाह यांनी ९ मिनिटांत उत्तर दिले. काँग्रेसने यावर टीका केली. शशी थरूर यांनी मणिपूरमधील हिंसाचार आणि बेकायदेशीर स्थलांतरावर चिंता व्यक्त केली. अमित शाह यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अशांतता निर्माण झाल्याचे सांगितले. शेवटी, राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.