CAG चा अहवाल, शीशमहल ते आमदारांचं निलंबन, दिल्ली विधानसभेतला मंगळवार का ठरला वादळी?
दिल्ली विधानसभेत भाजपाने २७ वर्षांनी सत्ता काबीज केली आहे. विशेष अधिवेशनात उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्या अभिभाषणादरम्यान आम आदमी पार्टीच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले. यामुळे आपच्या आमदारांनी ठिय्या आंदोलन केले. कॅग अहवालात मद्य धोरण बदलामुळे २००२.६८ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे नमूद आहे. या अहवालामुळे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि इतर नेत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.