दिल्लीत पुरुष मतदार भाजपाकडे वळले तर महिलांची मतं ‘आप’कडे जास्त का राहिली?
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने ४८ जागा जिंकून सत्ता मिळवली आहे. महिलांची मतं आपकडे वळली तर पुरुषांची मतं भाजपाला मिळाली, ज्यामुळे भाजपाचा विजय झाला. लोकनिती सीएसडीएसच्या सर्व्हेनुसार, ५१% पुरुष मतदारांनी भाजपाला मतदान केलं, तर ४९% महिलांनी आपला पाठिंबा दिला. भाजपाने महिला समृद्धी योजना जाहीर केली होती, परंतु आपच्या योजनांमुळे महिलांची मतं आपकडे राहिली.