स्वातंत्र्याची ५० वर्षे ते गोध्रा हत्याकांडावरील चर्चा; पाचवेळा लोकसभेचं कामकाज लांबलंय
यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेने विक्रमी वेळेत कामकाज केले. वक्फ दुरुस्ती विधेयकावर १२ तासांहून अधिक चर्चा झाली. लोकसभेचे कामकाज सकाळी ११ वाजता सुरू होऊन पहाटे २.४० वाजता संपले. राज्यसभेतही वक्फ विधेयकावर १२ तासांहून अधिक चर्चा झाली. संसदीय इतिहासात हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक वेळ चाललेले अधिवेशन ठरले. १९८१ मध्ये अत्यावश्यक सेवा देखभाल विधेयकावर सर्वाधिक वेळ चर्चा झाली होती.