महायुतीत वाद; काँग्रेसची एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर, संजय राऊत यांचाही प्रस्ताव
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आळीपाळीने मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिला आहे. महायुतीमध्ये या नेत्यांची घुसमट होत असल्याचे पटोले म्हणाले. त्यांच्या विधानाला महाविकास आघाडीतील नेत्यांनी पाठिंबा दिला. विजय वडेट्टीवार यांनी शिंदे यांचे कौतुक केले, तर संजय राऊत यांनी राजकारणात सर्व काही शक्य असल्याचे म्हटले.