१५० कोटी खर्च करुन दिल्लीत उभारण्यात आलं संघ मुख्यालय, ‘केशव कुंज’ची वैशिष्ट्ये काय?
दिल्लीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय 'केशव कुंज' ५ लाख स्क्वेअर फुटांमध्ये उभारण्यात आलं आहे. १५० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या मुख्यालयात १२ मजल्यांच्या तीन इमारती, वाचनालय, रुग्णालय, लॉन, हनुमान मंदिर, तीन ऑडिटोरियम आणि मोठं पार्किंग आहे. ७५ हजार देणगीदारांच्या मदतीने हे मुख्यालय उभं राहिलं आहे. सौर ऊर्जा पॅनल्स, कँटीन, आणि रिसर्चसाठी क्युबिकल्स यांसारख्या सुविधा येथे उपलब्ध आहेत.