सुप्रिया सुळेंनी पोस्ट केले जय पवार यांचे फोटो, अजित पवार शरद पवार एकत्र येण्याची नांदी?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचे लग्न लवकरच होणार आहे. सुप्रिया सुळे यांनी जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले आहेत. यामुळे अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील का, याची चर्चा सुरु होण्याची चिन्हं आहेत. २०२३ मध्ये अजित पवार शरद पवारांपासून वेगळे झाले होते.