भाजपाची सत्ता येताच दिला राजीनामा; स्वेच्छा निवृत्ती स्वीकारणाऱ्या सुजाता कार्तिकेयन कोण?
माजी आयएएस अधिकारी सुजाता कार्तिकेयन यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली आहे. केंद्राने त्यांच्या अर्जाला मंजुरी दिली. बीजेडी नेते व्हीके पांडियन यांच्या पत्नी असलेल्या कार्तिकेयन या ओडिशा केडरच्या २००० बॅचच्या अधिकारी होत्या. त्यांनी कटक आणि सुदरगड जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले. बीजेडी सरकारच्या काळात त्यांनी मिशन शक्ती उपक्रमाचे नेतृत्व केले. निवृत्तीच्या वेळी त्या राज्याच्या वित्त विभागात विशेष सचिव होत्या.