GBS बाधित गरीब रुग्णांचा उपचार खर्च पुणे महापालिका उचलणार; ‘या’ योजनेतून होणार तरतूद!
पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) रुग्णांची संख्या वाढत असून महाराष्ट्रात एकूण १०१ रुग्ण आहेत. पुणे महानगर पालिकेने २५,५७८ घरांचे सर्वेक्षण केले आहे. गरीब रुग्णांवर मोफत उपचार केले जातील. २०० इम्युनोग्लोबलिन इंजेक्शन्स खरेदी करून खासगी रुग्णालयांना पुरवले जातील. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे पालिका आयुक्तांनी सांगितले. पाण्याचे नमुने तपासले असून, विषाणू आढळलेले नाहीत.