महाकुंभमेळ्यातून नांदगावकरांनी आणलं गंगेचं पाणी; राज ठाकरे म्हणाले, “हड…”
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त चिंचवडमध्ये आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना श्रद्धा-अंधश्रद्धेतून बाहेर पडण्याचं आवाहन केलं. महाकुंभ मेळ्यात गेलेल्या कार्यकर्त्यांवर टीका करताना त्यांनी गंगेच्या पाण्याच्या स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सांगितलं की, देशातील नद्या स्वच्छ नाहीत आणि अंधश्रद्धा सोडून वास्तवाकडे पाहण्याची गरज आहे.