‘शिवशाही’ नाव असेलल्या बसमध्येच बलात्कार, आरोपीचा ‘चौरंग’ करा; मनसेची मागणी
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात बुधवारी पहाटे एका तरुणीवर बलात्काराची घटना घडली. आरोपी दत्तात्रय गाडे याच्या शोधासाठी पोलिसांची आठ पथके रवाना झाली आहेत. या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शालिनी ठाकरे यांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.