वर्षभरात मुंबईकरांची झाली सर्वाधिक आर्थिक फसवणूक, पुणेकर दुसऱ्या क्रमांकावर; इतर शहरांत…
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून आर्थिक फसवणुकीत आघाडीवर आहे. महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात राज्यात २,१९,०४७ आर्थिक फसवणुकीचे गुन्हे नोंदवले गेले. मुंबईत ५१,८७३ प्रकरणे तर पुण्यात २२,०५९ प्रकरणे नोंदली गेली. ठाणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, सोलापूर आणि इतर जिल्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.