पुणे शिवशाही बलात्कार प्रकरणात अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “थेट फाशी…”
पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्टँडवर फलटणला जाणाऱ्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. आरोपी दत्तात्रय गाडे याची ओळख पटली असून, त्याच्या शोधासाठी आठ पथके रवाना झाली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.