पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, पोलिसांनी सांगितला गुन्ह्याचा घटनाक्रम
पुण्यातील स्वारगेट येथे शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी दत्तात्रय गाडे याने पीडितेला फसवून बसमध्ये नेले आणि अंधाराचा फायदा घेत दुष्कृत्य केले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली असून त्याचा शोध घेण्यासाठी आठ पथके रवाना केली आहेत. पुणे हे विद्येचे माहेरघर असून अशा घटना धक्कादायक आहेत, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले.