पुण्यात आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर? मिनी बस अपघातात चौघांचा बळी!
पुणे शहरातील हिंजेवाडी भागात आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना नेणाऱ्या मिनी बसला आग लागून चार जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना सकाळी ७.३० वाजता घडली. बसमधील १४ प्रवाशांपैकी १० जणांनी उडी मारून जीव वाचवला, तर चार जण होरपळून मृत्युमुखी पडले. जखमींवर रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आयटी कर्मचारी संघटनांनी वाहनांच्या सेफटी ऑडिटची मागणी केली आहे.