पुण्यात चालकाच्या वैयक्तिक रागामुळे चार जण होरपळले; ‘ती’ बस पेटली नाही, पेटवली होती!
पुण्यातील हिंजेवाडी भागात बुधवारी सकाळी एका मिनी बसला आग लागून चार जणांचा मृत्यू झाला आणि आठ जण जखमी झाले. सुरुवातीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज होता, पण पोलिस तपासात चालक जनार्दन हंबर्डीकरने वैयक्तिक रागातून बस पेटवून दिल्याचं उघड झालं. हंबर्डीकरने आदल्या दिवशीच बसमध्ये ज्वालाग्राही रसायन ठेवलं होतं आणि चिंध्या पेटवून आगीचा भडका उडवला.