पुण्यात मराठी कर्मचाऱ्यांचा पगार थकवला, कार्यालयात हिंदी बोलण्याची सक्ती
पुण्यातील वाकडेवाडी येथील एअरटेल कार्यालयात मराठी तरुणांवर अन्याय झाल्याची घटना घडली. टीम लीडर शाहबाज अहमदने मराठी बोलण्यास नकार देत हिंदीतच बोलण्याची सक्ती केली आणि पगार रखडवला. मनसेचे राज्य सचिव आशिष साबळे पाटील यांनी हस्तक्षेप करून व्यवस्थापकांशी चर्चा केली. अखेर मनसेच्या दबावामुळे थकीत पगार देण्यात आला, अन्यथा एअरटेल कार्यालये फोडण्याचा इशारा दिला होता.