पुण्यातील वाहतूक खोळंब्यावर १,२६,४८९ कोटींचा तोडगा; जिल्हा नियोजन समितीत CMP सादर!
पुण्यातील वाहतूक समस्येवर उपाय म्हणून २७६ किलोमीटर लांबीचे नवे मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत, ज्यात पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या ठिकाणांचा समावेश आहे. या प्रकल्पाचा खर्च १ लाख २६ हजार ४८९ कोटी रुपये असेल. याशिवाय, पीएमपीएमएलसाठी ६ हजार नव्या बसेस आणि सहा बीआरटी मार्ग प्रस्तावित आहेत. या सर्व उपाययोजनांमुळे पुढील ३० वर्षांत पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होईल.