पुणे ते मुंबई अंतर अर्ध्या तासाने कमी होणार, ‘या’ रस्त्याचं काम ९० टक्के पूर्ण!
मुंबईसह पुणेकरांसाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन येत्या चार महिन्यांत होणार आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील लिंक रोडचं काम ९०% पूर्ण झालं असून, यामुळे पुण्याहून नवी मुंबई विमानतळापर्यंतचा वेळ २ तासांपर्यंत कमी होणार आहे. लोणावळ्याजवळील लिंक रोडमुळे प्रवासाचा वेळ आणि अंतर कमी होईल. हा प्रकल्प जून २०२५ पर्यंत पूर्ण होईल.