‘ती स्वतःहून बसमध्ये गेली’, आरोपी दत्तात्रय गाडेच्या वकिलांचा दावा; सुनावणीत काय झालं?
पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आरोपी दत्तात्रय गाडेला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीच्या वकिलांनी तो निर्दोष असल्याचे सांगितले. वकिलांच्या मते, घटना दोघांच्या संमतीने घडली होती. आरोपी पळून गेला कारण त्याला जीवाची भीती वाटत होती.