“आम्हाला यातला एकही रुपया नको”, सरपंचांनी नाकारलं एक लाखांचं बक्षिस
पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक केल्यानंतर गुणाट गावात बक्षीसाच्या रकमेवरून वाद सुरू झाला आहे. गावकऱ्यांनी पोलिसांना मदत केल्याने बक्षीसाची रक्कम कोणाला द्यायची यावर गोंधळ निर्माण झाला. सरपंच रामदास काकडे यांनी बक्षीस नको असल्याचे जाहीर केले. आरोपीच्या कुटुंबीयांना त्रास होत असल्याचेही गावकऱ्यांनी सांगितले. आरोपीला १२ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे.