पुण्यात निवृत्त बँक मॅनेजर महिलेला २.२२ कोटींचा गंडा; दीन दयाल उपाध्याय यांच्या नावाने…
प्रशासनाकडून सातत्याने आवाहन करूनही ऑनलाईन घोटाळ्यांचं प्रमाण कमी होताना दिसत नाही. पुण्यात ६२ वर्षीय निवृत्त महिला बँक मॅनेजरला २ कोटी २२ लाखांचा गंडा घालण्यात आला. भामट्यांनी विविध सरकारी अधिकारी आणि अर्थमंत्रालयातील ओळखी सांगून महिलेला विमा पॉलिसी खरेदीसाठी पैसे मागितले. फसवणूक लक्षात आल्यानंतर महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली असून तपास सुरू आहे.