Video :पुण्यात पोलीस भरतीदरम्यान महिला उमेदवारांची तोबा गर्दी, गेट तुटला अन् …
पुण्यातील पोलीस भरतीदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. १९ मार्च रोजी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात ५३१ महिला पोलीस जागांसाठी भरती सुरू होती. तीन हजारांहून अधिक महिला उमेदवार आल्या होत्या, ज्यामुळे गेट तुटून पडला आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली. काही महिला जखमी झाल्याचं म्हटलं जातंय. पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी चेंगराचेंगरी झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे.