“तो माझ्या संपर्कातील मैत्रिणींचे…”, आरोपीच्या मैत्रिणीकडून मोठी माहिती
पुण्यातील स्वारगेट येथे शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपी दत्तात्रय गाडेची ओळख पटली आहे. पोलिसांनी १३ पथके तैनात करून तपास सुरू केला आहे. आरोपीच्या मैत्रिणीने धक्कादायक माहिती दिली असून, गाडेच्या संपर्कातील मित्रांची चौकशी सुरू आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, सखोल तपास आणि पीडितेला मदत देण्याचे आदेश दिले आहेत.