पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे कोण?
पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकात मंगळवारी पहाटे शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला. आरोपी दत्तात्रय गाडे (वय ३५) सराईत चोर असून, त्याच्या शोधासाठी १३ पोलीस पथके तैनात केली आहेत. गाडेवर अनेक चोरीचे गुन्हे आहेत. पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांची आणि मैत्रिणीची चौकशी केली आहे. एसटी बसची न्यायवैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.