Apple च्या Siri वर युजर्सचं खासगी संभाषण रेकॉर्ड; ९.५ कोटी डॉलर दंड; तक्रारदारांना मिळणार
Apple कंपनीच्या उत्पादनांमध्ये वापरकर्त्यांच्या खासगी संभाषणांचा गैरवापर झाल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेतील ओकलँड कॅलिफोर्निया फेडरल कोर्टात या प्रकरणाची सुनावणी चालू आहे. Apple ने ९५ मिलियन डॉलर्स दंड भरण्यास तयार असल्याचे न्यायालयात सांगितले. वापरकर्त्यांनी Siri सुविधा खासगी संभाषण रेकॉर्ड करून जाहिरातदारांना दिल्याचा आरोप केला आहे. दंडाची रक्कम म्हणजे Apple चा फक्त ९ तासांचा नफा आहे.