एक iPhone बनवायला किती खर्च येतो? ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे किमती किती वाढणार?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ५ एप्रिलपासून लागू केलेल्या नव्या टॅरिफ दरांमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. चीनमधून आयात होणाऱ्या उत्पादनांवर १२५ टक्के समन्यायी व्यापार कर लागू केल्याने अॅपल कंपनीला मोठा फटका बसला आहे. आयफोनच्या उत्पादन आणि निर्यात खर्चात वाढ होऊन, आयफोनच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेत उत्पादन करणंही खर्चिक ठरू शकतं, त्यामुळे कंपन्या या टॅरिफ वॉरच्या समाप्तीची वाट पाहत आहेत.