…तर झुकरबर्ग यांना Instagram-WhatsApp विकावं लागू शकतं; दोन अॅप्समुळे मेटा अडचणीत?
मार्क झुकरबर्ग सध्या फेडरल ट्रेड कमिशनच्या (एफटीसी) फसवणुकीच्या खटल्याचा सामना करत आहेत. त्यांनी इन्स्टाग्राम व व्हॉट्सअॅपच्या अधिग्रहणाचे समर्थन केले आणि मेटा कंपनीच्या मक्तेदारीच्या आरोपांना विरोध केला. झुकरबर्ग म्हणाले की, मेटाचे उद्दीष्ट लोकांना जोडणे आहे. एफटीसीने २०११-२०१२ मधील झुकरबर्ग यांच्या ईमेल्सचा दाखला दिला आहे. आरोप सिद्ध झाल्यास झुकरबर्ग यांना इन्स्टाग्राम व व्हॉट्सअॅप विकावे लागू शकते.