Video: कौमुदीच्या संगीत सोहळ्यात ‘आई कुठे…’ फेम अभिषेक देशमुखचा पत्नीसह जबरदस्त डान्स
‘आई कुठे काय करते’ मालिका संपल्यानंतर अभिनेत्री कौमुदी वलोकरची लग्नीनघाई सुरू झाली. २२ डिसेंबरपासून कौमुदीच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली. ग्रहमख, मेहंदी, हळद, संगीत आणि सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळा कौमुदीचा पाहायला मिळाला. २७ डिसेंबरला कौमुदीने आकाश चौकसे यांच्याशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. सध्या दोघांच्या लग्नातील फोटो, व्हिडीओ व्हायरल होतं आहेत. कौमुदी वलोकरच्या संगीत सोहळ्यातल्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.